Nashik Fraud News : चांदवडच्या मका व्यापाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा | पुढारी

Nashik Fraud News : चांदवडच्या मका व्यापाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा, येथील तरुण मका व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करत दिंडोरीतील एकाने तब्बल सात लाख ६४ हजार ४८८ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद त्या मका व्यापाऱ्याने चांदवड पोलिसांत दिली आहे. (Nashik Fraud News )

चांदवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड बाजार समितीत भूषण वसंत हेडा (३८, रा. गुजरात गल्ली) यांची श्री ट्रेडिंग नावाची मका व कांदा खरेदी-विक्रीची परवानाधारक फर्म आहे. दिंडोरीतील हेमंत ढाकणे यांचा विजय हॅथरीज नावाचा व्यवसाय आहे. ढाकणे यांनी हेडा यांच्याकडून दि. ७ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान १५ लाख ३१ हजार रुपयांचा ७४५.८५ क्विंटल मका खरेदी केला होता. त्यातील सात लाख ६६ हजार रुपये हेडा यांच्या बँक खात्यात ढाकणे यांनी जमा केले. मात्र उर्वरित सात लाख ६४ हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भूषण हेडा यांनी चांदवड पोलिस स्थानकात ढाकणे (रा. दिंडोरी, म्हसरूळ साहिल पार्क) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button