बीड : दोन मुलांसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू | पुढारी

बीड : दोन मुलांसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपुर (ता.अंबाजोगाई) येथील महिलेचा दोन मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला. या घटनेबाबत घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. द्रौपदी संतोष गोईनवाड, पूजा (वय ७ वर्ष), सुदर्शन (वय ४वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील संतोष गोईनवाड हे आपली पत्नी द्रौपदी व मुलांसह अंजनपुर परिसरात राहतात. तसेच संतोष गोईनवाड हे अंजनपुर परिसरातील अमोल शितोळे यांच्या शेतात सालगडी म्हणून मजुरी करतात. दरम्यान मंगळवारपासून (दि.२१) रात्रीपासून दौपदी या आपल्या दोन मुलांसह बेपत्ता होत्या. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा या तिघांचाही मृतदेह अमोल शितोळे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्हीही मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. या तिघांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून हा घातपात असावा, अशी चर्चा परिसरात आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील संतोष गोईनवाड हे पत्नी सौ. द्रौपदी गोईनवाड हे कु. पूजा वय (७ वर्ष) आणि चि. सुदर्शन वय (४वर्ष) या दोन लहान मुलासह युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपुर (कोपरा) ता. अंबाजोगाई येथील अमोल शितोळे यांच्या शेतात सालगडी म्हणून मजुरी करतात. दरम्यान दि. २१ मे रोजी रात्री १०:०० वा. पासून सौ. द्रौपदी गोईनवाड ही तिच्या कू. पूजा आणि चि. सुदर्शन या दोन मुलांसह बेपत्ता होती. तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्या नंतर दि. २२ मे रोजी सकाळी ८:३० वा. अमोल शितोळे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत द्रौपदी व कू. पूजा आणि चि. सुदर्शन तिघाचे मृतदेह आढळून आले.
पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने आई आणि दोन्ही मुलांची मृतदेह पाण्या बाहेर काढली असून ते शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.
दरम्यान हा अपघात ही घातपात की आत्महत्या असावी. याची चर्चा परिसरात असून या तिघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button