केंद्रीय गृहमंत्रालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी | पुढारी

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला आल्यामुळे बुधवारी एकच खळबळ उडाली. पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी गृहमंत्रालयाच्या इमारतीचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, कुठेही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला दुपारी ३ च्या सुमारास हा धमकीचा ईमेल आला. दिल्लीतील द्वारका परिसरातही बॉम्बची अफवा होती.

Back to top button