Washim News : समृद्धी महामार्गावर अपघात २ ठार, ३ जखमी | पुढारी

Washim News : समृद्धी महामार्गावर अपघात २ ठार, ३ जखमी

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरून नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव चारचाकीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यामध्ये २ जण ठार, तर २ जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला आहेत.

भरधाव चारचाकीचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन समृद्धी महामार्गाच्या संरक्षक कठड्याला धडकली. यामुळे गाडीतील ५ प्रवाशी बाहेर पडले. यातील दोन जखमींचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर ३ जण जखमी झाले. जखमी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. गाडीतील सर्व प्रवासी हैदराबादचे आहेत. अपघातातील गंभीर जखमींवर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button