बीड: सोनीमोहा येथे वीज पडून महिलेचा मृत्यू | पुढारी

बीड: सोनीमोहा येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

धारूर, पुढारी वृत्तसेवा: शेतात काम करीत असताना अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोनीमोहा शिवारात घडली. संगिता मच्छिंद्र कराड (वय ४८, रा. डुकडेगाव, सध्या रा. सोनिमोहा) असे मृत महिलेचे नाव आहे.

सोनीमोहा येथे मच्छिंद्र कराड मागील दहा वर्षापासून राहत आहे. त्यांना दीड एकर जमीन आहे. मच्छिंद्र कराड यांचे सोनीमोहा येथील धुनकवड पाटीजवळ असलेल्या आपल्या शेतात जनावरे चारत होते. यावेळी त्यांची पत्नी संगीता कराड या शेतात आल्या. शेतात काम करत असताना पाऊस सुरू झाल्याने त्याजवळ असलेल्या सागाच्या झाडाखाली थांबल्या होत्या.

यावेळी झाडासह अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी काही अंतरावर त्यांचे पती उभे होते. त्यांना मात्र काहीसा धक्का बसला. संगीता यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button