वाशिम: बाजार समितीमध्ये पावसामुळे शेतमालाचे नुकसान

वाशिम: बाजार समितीमध्ये पावसामुळे शेतमालाचे नुकसान

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: वाशिम शहरात आज तीनच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.  दुपारच्या वेळी पाऊस झाला. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल ओट्याच्या खाली रस्त्यावर टाकलेला असल्यामुळे  माल भिजला.

यावेळी शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले. याआधी सुद्धा अनेकदा असेच प्रकार घडलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र या बाबीकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news