Kenya gold mine collapse | केनियात सोन्याची खाण कोसळून ५ ठार, अनेकजण बेपत्ता

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर केनियामध्ये सोन्याची खाण कोसळून किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत, असे अधिकारी आणि स्थानिक माध्यमांनी सांगितले. हिलो आर्टिसनल खाणीत ५ खाण कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी तीन लोक बेपत्ता आहेत, असे प्रादेशिक आयुक्त पॉल रोटिच यांनी शुक्रवारी उशिरा दूरध्वनीवरून रॉयटर्सशी बोलताना सांगितले.

"बचावकर्ते, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी खाण कोसळली तेव्हा खाणीत किमान ८ खाण कामगार होते. ते जिवंत गाडले गेले आहेत," असेही रोटिच म्हणाले.

२ जखमी खाण कामगारांना रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त केनियातील वृत्तवाहिनी NTV ने शनिवारी सकाळी दिले. मार्साबिट काऊंटीचे आयुक्त डेव्हिड सरूनी यांनी एनटीव्हीला सांगितले की, "पावसामुळे खाणीचा भाग खचला आहे."

केनियात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले असून यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

सिटिझन टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मार्चमध्ये इथिओपियन सीमेजवळील खाणी बंद करूनही येथे खाणकाम सुरूच होते. या भागावर ताबा मिळवण्यासाठी स्थानिक समुदायांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक लोक मारले गेले होते.

हे ही वाचा ;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news