Jalgaon News | रामदेववाडी प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

Jalgaon News | रामदेववाडी प्रकरणातील तिसऱ्या संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – रामदेव वाडी प्रकरणांमध्ये तिसऱ्या संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागून होते.

तालुक्यातील रामदेववाडी या गावाजवळ 7 मे रोजी कार व दुचाकीच्या अपघातात आईसह दोन मुलांचा व भाच्याचा असा चार जणांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी संशयित आरोपी अखिलेश पवार व अर्णव कौल उपचार सुरू असल्याने गेल्या 14 दिवसापासून त्यांना अटक करण्यात आली नव्हती.
त्यांना दि. 23 रोजी अटक केल्यानंतर न्यायालयाने 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आज याच रामदेव वाडी अपघात प्रकरणात तिसरा संशयित आरोपी ध्रुव सोनवणे याला डीवायएसपी संदीप गावित यांनी न्यायालयात दुपारी हजर केले असता न्यायालयाने त्यालाही 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात सोमवारी काय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. या प्रकरणात तिसरा आरोपी ध्रुव सोनवणे याच्याकडून वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने नैसर्गिक दृष्ट्या व पोलिसांना तपासात सहकार्य व्हावे म्हणून 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Back to top button