चंद्रपूर: ताडोबात आढळले ५५ वाघ, १७ बिबट, ६५ अस्वल | पुढारी

चंद्रपूर: ताडोबात आढळले ५५ वाघ, १७ बिबट, ६५ अस्वल

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा: ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba Andhari Tiger Reserve) कोअर व बफर झोनमध्ये 11 वनपरिक्षेत्रामध्ये बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना पार पडली. कोअर व बफर झोन मध्ये 55 वाघ, 17 बिबट तर 65 अस्वल आढळून आली. दोन्ही ठिकाणी 5009  वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही झोमनमध्ये वाघांची संख्या 32, बिबट 1 तर अस्वलांची संख्या 40 ने वाढली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यप्राणी प्रगणनेत किती प्राणी आढळून आले?

  • कोअर व बफर झोनमध्ये 11 वनपरिक्षेत्रामध्ये बुध्द पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी प्रगणना
  • ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल,  १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ रानगवे आढळले.
  • एकूण ५,००९ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.
परंपरागत काळापासून बुध्द पौर्णिमेच्या रात्री करण्यात  होत असलेल्या ताडोबाच्या कोअर झोनमध्ये 5 वनपरिक्षेत्रात 76 मचाणी तर बफर झोनमध्ये 6 वनपरिक्षेत्रात 79 मचाणी उभारण्यात आलेल्या होत्या. बफरमध्ये राज्यभरातील 160 पर्यटनप्रेमींनी चंद्राच्या लख्ख्‍ प्रकाशात वन्यप्राण्यांच्या नोंदी घेतल्या. कोअर झोनमध्ये वनाधिकार व क्षेत्रीय वन कर्मचा-यांनी प्राणी गणना केली. कोअर व बफर क्षेत्र मिळून ५५ वाघ, १७ बिबट, ८६ रानकुत्रे, ६५ अस्वल,  १४५८ चितळ, ४८८ सांबर, ५५९ रानगवे आणि मांसभक्षी व तृणभक्षी 2728 असे एकूण एकूण ५,००९ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.
बफरझोनमध्ये वाघ 26 आढळून असून एका बच्छड्याचा समावेश्‍ आहे. मागील वर्षी फक्त 14 वाघ आढळून आले होते. यावेळी 11 ने वाघाची संख्या वाढली आहे. बिबट 8 आढळून आले असून यावेळी 4 ने संख्या कमी झाली आहे. अस्वलाची संख्या तब्ब्ल 32 झाली असून मागील वर्षीपेक्षा अस्वलांच्या संख्येत 27 ने वाढ झाली आहे. तृणभक्ष्यी प्राण्यांमध्ये भेडकी 18, चितळ 403, सांबर 166, चौसिंगा 8, निलगाय 34, रानगवा 344 असे एकूण 973 प्राण्यांची नोंद करण्यात आली. तसेच वानर 340, रानडुक्कर 363,रानकुत्रा 17, सायळ 1, मुंगूस 10 आढळून आले. मांजर प्रकारामध्ये जवादी मांजर 2, उदमांजर 4,रानमांजर 3, खवल्या मांजर 9 तर इतर 32 वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. विषेश म्हणजे यावेळी मोरांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. पर्यटन प्रेमींना मोरांना जवळून पाहता आले. मोरांची 97 संख्या आढळून आली. चिकारा, कोल्हे व तडसाची नोंद ० आहे.
सर्वात जास्त वन्यप्राणी खडसंगी वनपरिक्षेत्रात 511, त्यापाठोपाठ मोहूर्ली मध्ये 481, मुल 341, शिवणी 316 वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. सर्वात कमी वन्यप्राणी चंद्रपूर 146, पळसगाव मध्ये 122 ची नोंद करण्यात आली. सर्वाज जास्त वाघ शिवणी वनपरिक्षेत्रात 10, मूल मध्ये 7,  मोहूर्ली  5, खडसंगी  3, तर पळसगाव क्षेत्रामध्ये 1 एकाची नोंद घेण्यात आली. चंद्रपूर वनपरिक्षेत्रात एकही वाघाची नोंद झाली नाही.
कोअर झोनमध्ये २९ वाघ, ९ बिबट, ६९ रानकुत्रे, ३३ अस्वल, २१५ रानगवे, १०५५ चितळ, ३२२ सांबर आणि मांसभक्षी व तृणभक्षी 1360 असे एकूण ३,०९२ प्राण्यांची नोंद झाली आहे. मागील मागील वर्षीच्या तुलनेत वाघांची संख्या 10 ने वाढली आहे. बिबट 5 तर अस्वलाची संख्या 13 ने वाढली आहे.
मागील काही महिण्यापासून अवकाळीमुळे ताडोबातील नैसर्गीक स्त्रोतामध्ये पाणी साठून असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाणी टंचाई भासली नाही. पाणवठ्यावरूनही वन्यप्राण्यांची  तहान भागत असल्याचे चित्र ताडोबात पाहायला मिळत असतानाच पाणवठे व नैसर्गीक स्त्रोतावर वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने समाधान कारक नोंदी करण्यात आल्या.

हेही वाचा

 

Back to top button