बोधेगाव : शेतातून गांजाची झाडे जप्त; एकावर गुन्हा दाखल | पुढारी

बोधेगाव : शेतातून गांजाची झाडे जप्त; एकावर गुन्हा दाखल

बोधेगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे पोलिसांनी छापा टाकून 13 किलो 965 ग्रॅम वजनाची सुमारे 70 हजार रुपये किमतीची गांजाची दोन हिरवी झाडे जप्त करून शंकर आसराजी छाजेड या आरोपीस अटक केली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की बालमटाकळी येथील शेतजमीन गट नं 74 मध्ये शंकर छाजेड (वय 30) रा. याने शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत शेवगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी तथा प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळाली.

रेड्डी यांनी पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकासह जाऊन सोमवारी (दि. 28) रात्री नऊच्या सुमारास ठिकाणी छापा टाकला. तेथे गांजाची हिरवी झाडे वाढवलेल्या स्थितीत पोलिसांना सापडली. आरोपी शंकर आसराजी छाजेड याने सदरची झाडे लावली व वाढवल्याची कबुली दिली.. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे सहायक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे व आशिष शेळके, पालिस उपनिरीक्षक भास्कर गावंडे, पोलिस नाईक ईश्वर गर्जे, सुखदेव धोत्रे, कॉन्स्टेबल किशोर काळे, संपत खेडकर, संतोष वाघ, प्रशांत आंधळे, अस्लम बेग, वैभव काळे, संदीप म्हस्के यांनी ही कामगिरी केली.

हेही वाचा

हिंगोलीत घरफोडी, चोरट्यांनी २.३५ लाखांचा ऐवज पळविला

नाशिक : शरद पवार गटाची कार्यकारिणी घोषित, १२ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

धक्कादायक! अहमदनगरमध्ये तहसीलदारांचा गळा दाबून जमिनीवर पाडले; वहिवाट रस्त्याचा वाद

Back to top button