घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर गजाआड; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अखेर गजाआड; 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर : पुढारी वृत्तसेवा : कोतवाली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला केडगाव येथून जेरबंद केले. त्याच्याकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, पाच घरफोडीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. विष्णू सोनबा धोत्रे (रा. वडारगल्ली, केडगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 7 ते 12 मे 2024 दरम्यान मधुकर तबाजी भावले (रा. आशीर्वाद निवास, बालाजी कॉलनी, शाहुनगर, केडगाव) हे मुलाकडे पुण्याला गेले होेते. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून, कपाटाचे लॉक तोडून चोरानी 15 हजार रुपये चोरून नेले. याबाबत मधुकर भावले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने केडगाव परिसरात शोध घेऊन आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीत आणखी चार घरफोड्यांची उकल झाली. आरोपी धोत्रे याने घरात लपवून ठेवलेला 28 हजार रोख व 22 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल काढून दिला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक योगीता कोकाटे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, हेडकॉन्स्टेबल राहुल शिंदे, शाहीद शेख, योगेश भिंगारदिवे, ए.पी.इनामदार, संदीप पितळे, अविनाश वाकचौरे, संगीता बडे, अभय कदम, दीपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सुरज कदम, प्रमोद लहारे, अमोल गाडे, सुजय हिवाळे, सचिन लोळगे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

Back to top button