Facebook reels : फेसबुक युजर्ससाठी आनंदाची बातमी; आता रिल्स ६० सेकंदा ऐवजी…. | पुढारी

Facebook reels : फेसबुक युजर्ससाठी आनंदाची बातमी; आता रिल्स ६० सेकंदा ऐवजी....

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्क झुकेरबर्गची मालकी असलेलं फेसबुक हे जगभरात लोकप्रिय असं सोशल मीडिया अॅप आहे. सर्वात जास्त वापरणाऱ्या सोशल मीडिया साईट पैकी कोणती सोशल साईट वापरली जाते असं जर म्हंटले तर फेसबुक या सोशल मीडिया साईटचं नक्कीच नाव घेता येईल. या माध्यमातून जुने मित्र आणि नातेवाईक यांच्याशी जोडता येतं, तुमचे विचार व्यक्त करु शकता, विचारांची देवाण-घेवाण करु शकता. तुम्ही एकमेकांशी दूर राहूनही जगाच्या पाठीवर असलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणींशी, नातेवाईकांशीही कनेक्ट राहता येते. फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर आणून त्यामध्ये सुलभता आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. आता फेसबुकने आणखी एक नव फिचर आणलं आहे. हे फिचर रिल्ससंदर्भात आहेत. जाणून घ्या, नेमकं काय आहे हे नवं फिचर (Facebook reels)

Facebook reels : आता फेसबुक रिल्सची मर्यादा ६० ऐवजी ९० सेकंद

फेसबुकवर नवनवीन फिचर आपल्या युजरसाठीमेटाने (META) नुकतीच एक घोषणा केली आहे की, फेसबुक रिल्सचे सेंकद वाढवण्यात आले आहेत. ही सेकंद नवीन घोषणेनुसार ९० सेकंद करण्यात आली आहे. यापूर्वी रिल्स ६० सेकंदाचे बनवता येत होते. आता ती ३० सेकंदाने वाढवण्यात आली आहे. मेटाने इनस्टाग्राम रिल्सच्या ९० सेकंदाचे समर्थन केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. मेटाने आपल्या युजर्ससाठी रिल्स ६० सेकंदाऐवजी ९० सेकंद केलं आहे. त्याचबरोबर नवीन अशा हटके अशा टेम्पलेट दिल्या आहेत. या टेम्पेलटचा वापर करुन तुम्ही तुमचे रिल्स अधिक हटके करु शकता.

त्याचबरोबर आणखी एक हटके असे फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक गोष्ट दिली आहे. ती म्हणजे मेमोरिजसह रिल्स करता येणार आहे. युजर्स आपल्या अकाउंटवर काही ना काही शेअर करत असतो. तर याच मेमोरिजचं रिल्स करता येणार आहे. ही एक बाब फेसबुक युजर्ससाठी आनंदाची आहे.

 

हेही वाचा

 

Back to top button