ट्विटरला Bluesky देणार जोरदार टक्कर, संस्थापक आणि माजी सीईओने आणला नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म | पुढारी

ट्विटरला Bluesky देणार जोरदार टक्कर, संस्थापक आणि माजी सीईओने आणला नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

पुढारी ऑनलाईन: जगातील सर्वात मोठ्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरमध्ये सुरू असलेल्या अनेक उलथापालथीतून काळ कसा बदलतो याचे ताजे उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेकाळी ट्विटरचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या जॅक डोर्सी यांनी ट्विटरच्या स्पर्धेत ‘Bluesky’ नावाचा नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जगासमोर सादर केला आहे. Bluesky ची सध्या टेस्टिंग सुरू असून सध्या ही सुविधा अ‍ॅपलच्या अ‍ॅप्स स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या Bluesky फक्त इनव्हाईटद्वारे बीटा आवृत्तीवर वापरता येते.

अ‍ॅपलच्या अ‍ॅप्स स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध झाल्यापासून २४ तासांच्या आत 2,000 हून अधिक लोकांनी इंस्टॉल केले. Bluesky वर तुम्ही Twitter प्रमाणेच एक क्लिक करून 256 कॅरेक्टर्स वापरुन पोस्ट करू शकता.

ट्विटर युजर्सला कोणत्याही पोस्टसाठी “”What`s happening?” असे विचारते. तर, Bluesky वर आपल्याला “What`s up?” असे पाहायला मिळेल. तुम्ही Bluesky वर युजर्सला ब्लॉक, म्यूट आणि शेअर देखील करू शकता.

Bluesky वर ट्विटरसारखाच डिसकव्हर टॅब आहे. ज्यामध्ये आपल्याला “who to follow” सारखे सजेशन येतात. तसेच यामध्ये लोकांना फीडच्या स्वरूपात ट्विटर प्रमाणेच पोस्ट पाहायला मिळतात. सध्या यात डायरेक्ट मॅसिजिंग ही सुविधा नाही, पण Bluesky बऱ्याच अंशी ट्विटरसारखेच आहे.

Bluesky प्रोजेक्टवर ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी हे 2019 पासून काम करत आहेत. गेल्या वर्षी ट्विटर पूर्णपणे सोडल्यापासून जॅक डोर्सी Bluesky प्रोजेक्टवर पूर्णवेळ काम करत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जॅकने Blueskyबद्दल ट्विटरवर एक पोस्टही टाकली होती. Bluesky ला गेल्या वर्षी 13 मिलियन डॉलर एवढे फंडिंग मिळाले आहे.

Back to top button