नगर : जर्मनीचे 40 भक्त श्रीसाई चरणी लिन | पुढारी

नगर : जर्मनीचे 40 भक्त श्रीसाई चरणी लिन

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  श्री साई बाबांच्या भक्तीचा प्रसार-प्रचार जगाच्या कानाकोपर्‍यात नुसता पोहचला नाही, तर त्यांची भक्ती मोठ्या श्रद्धेने केली जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जर्मन देशातील 40 भक्त श्रीसाई चरणी लिन होत मनोमन सुखावले.  साई सतचरित्र हेच एक प्रमाण मानून मानवतेची शिकवण देणारे श्री साईबाबांचा वैचारिक ठेवा जिवनात परिवर्तन घडवितो. समाधान आणि मोक्षाचा मार्ग मानवतेतुन मिळतो, अशी दृढ भावना या परदेशी श्रीसाईभक्तांनी व्यक्त केली.

गेल्या 30 वर्षांपासून सातासमुद्रापार श्रीसाई भक्तीचा झरा वाहता झाला आहे. श्री साईबाबांच्या शिर्डीत विदेशी भाविकांचे मन रमते, हे जर्मनीतील भक्तांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. या भाविकांचा सन्मान साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केला.

भाषांतर करून जर्मनीतील भाविकांशी संवाद
श्री साईबाबा एक फकीर होते. ते जी भीक्षा आणत ती भाविकांना वाटून देत असे. त्यांनी संपूर्ण अवतार कार्य भक्तांसाठी खर्ची केले. त्यातून मानवता हा विचार पुढे आणला. हे सांगण्यासाठी श्री साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांना भाषांतर करून जर्मन भाविकांशी संवाद साधावा लागला.

श्री साईबाबांच्या दर्शनाची ओढ..!

गेल्या 30 वर्षांपासून जर्मनीतील भाविक शिर्डीस येतात. मानवता हृदयी ठेवून मनोभावे श्री साई समाधी, द्वारकामाई, चावडी आणि गुरूस्थानाचे ते दर्शन घेतात. या भक्तांसाठी शिर्डी हेच ‘चारी धाम’ ठरू लागले आहे. हे भक्त श्री साई बाबांच्या प्रसादालयात जाऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. जर्मनीच्या श्रीसाई मंदिरात मनोभावे साई पूजन- अर्चन करतात. परदेशी भाविकांना श्री साई दर्शनाची ओढ दिसते.

Back to top button