शिरूर : नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत चालकाचा मृत्यू | पुढारी

शिरूर : नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीत चालकाचा मृत्यू

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : उसाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्ता सोडून थेट कठडा नसणार्‍या विहिरीत गेली. या अपघातात कारचालक तरुणाचा मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील अण्णापूर हद्दीत हा अपघात घडला. राहुल गोपीनाथ पठाडे (वय 40, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे. राहुल पठाडे हा त्याच्याकडील अल्टो कार (एमएच 16 एटी 1662)ने शिरूरच्या दिशेने जात होता.

अण्णापूर हद्दीत कार आली असता समोर असलेल्या उसाची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीला तो ओव्हरटेक करू लागला. या वेळी भरधाव कारवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि कार रस्ता सोडून 15 फुटांवरील कठडा नसलेल्या विहिरीत गेली आणि पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी शिरूर पोलिसांना दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस कर्मचारी गणेश देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Back to top button