भारत बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद, चक्काजाम करणाऱ्या दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना अटक | पुढारी

भारत बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद, चक्काजाम करणाऱ्या दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना अटक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : भारत बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद : किसान मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्राने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी बेळगाव जिल्ह्यात आज शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.

सोमवारी सकाळी भारत बंदची हाक देऊन चन्नमा चौकात रस्ता रोको करणाऱ्या सुमारे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर मुख्य बस स्थानकाजवळ टायर पेटवून आंदोलन करणाऱ्या चाळीस शेतकऱ्यांनाही यावेळी अटक करण्यात आली.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढला. ट्रॅक्टर्स, वाहने घेऊन काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे चन्नम्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पूर्ण चक्काजाम झाला होता. सुमारे दोन तासभर हे रस्ते रोखून धरण्यात आले.

भारत बंदला बेळगावात संमिश्र प्रतिसाद

चन्नमा चौकात आज सकाळी धरणे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या ठिकाणी सुमारे ७० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात घेऊन ठेवले.

सकाळी मुख्य बसस्थानकासमोर टायर पेटवून आंदोलन करणाऱ्या चाळीस पोलिसांनी ताब्यात घेतले बेळगाव परिसरातील आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ट्रॅक्टर व इतर वाहनांमधून हा मोर्चा काढल्यामुळे चन्नमा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्ता पूर्णपणे चक्काजाम झाला होता. सुमारे दीड ते दोन तास या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

जिल्हाधिकारी एम. जी हिरेमठ यांना शेतकऱ्याकडून निवेदन देण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील बैलहोंगल चिकोडी, अथणी या तालुक्यांमध्येही शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी धरणे आंदोलन करून केंद्र शासनाने केलेल्या कृषी कायद्याचा निषेध केला.

हे ही वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button