Shyam Rangeela : पंतप्रधान मोदींच्या विरोधात मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला लोकसभा लढवणार!

Shyam Rangeela : पंतप्रधान मोदींच्या विरोधात मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला  लोकसभा लढवणार!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवणारा कॉमेडियन श्याम रंगीला आता राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. आपण लवकरच वाराणसीत येणार असून उमेदवारी अर्ज कधी दाखल करणार याची माहिती देणार असल्याचे त्यांने यावेळी सांगितले.

आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत श्याम रंगीला म्हणाला, "मी माझ्या मनातलं बोलायला आलो आहे. तुमच्या मनात प्रश्न आहे की, आपण ज्या बातम्या ऐकतोय ते खरं आहे का? हा विनोद आहे का?" कॉमेडियन जरूर विनोद करत असेल पण हा विनोद नाही, मी वाराणसीतून आणि मोदीजींच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.

लोकशाही जीवंत राहावी यासाठी मी हे करत असल्याचे मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला यांने सांगितले. तो म्हणाले की, आजकाल कोण उमेदवारी कधी मागे घेईल हे कोणीच सांगू शकत नाही. 29 वर्षीय श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीमुळे प्रसिद्धीझोतात आला.

पुढे श्याम रंगीला म्हणाला, 'आम्ही इथे लोकशाही वाचव्यासाठी आलो आहे. येथे लोकांना मतदानाचा पर्याय मिळेल. सुरत आणि इंदूरसारखी परिस्थिती येथे होणार नाही. इंदूर आणि सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आहेत. सुरतमध्ये भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय इंदूरमध्ये आता कोणतीही लढत नाही आणि फक्त छोटे पक्ष किंवा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news