अमरावती : अपघातात वडिलांसह एका मुलीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर | पुढारी

अमरावती : अपघातात वडिलांसह एका मुलीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: लोणी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अकोला मार्गावर नागझिरी जवळ भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीवरील वडिलांसह दोन मुलींना चिरडल्याची घटना बुधवारी (दि.१) घडली. या अपघातात वडील सय्यद मोहसिन सय्यद मुसा (वय ३८, रा. ढंगारखेडा, कारंजा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आयशा सय्यद मोहसीन (वय.१३) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, दुसरी मुलगी आशना सय्यद मोहसिन (वय.१५) ही गंभीर जखमी आहे. तिला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी इयत्ता नववीचा निकाल घेण्यासाठी दोन्ही मुली आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरुन शाळेत जात होत्या. त्यावेळी हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद मोहसिन हे आपल्या दोन्ही मुलींसोबत ढंगारखेडा येथून अमरावतीकडे १ मे निमित्त शाळेत असलेल्या निकालासाठी येत होते. दोन्ही मुली नववीत शिकत होत्या. दरम्यान कारंजा मार्गावर नागझिरी येथे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम. एच 15 जेसी 1674 या भरधाव वाहनाने चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेतच दुचाकीस्वार वडिलांसह दोन्ही मुली बोलेरो पिकअप वाहनाच्या खाली सापडल्या. दरम्यान वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. संतप्त नागरिकांनी बोलेरो पिकप वाहन जाळल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा

Back to top button