Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या एल्गारामुळे राजधानी दिल्लीची अभूतपूर्व कोंडी ! वाहतूक कोलमडली | पुढारी

Bharat Bandh : शेतकऱ्यांच्या एल्गारामुळे राजधानी दिल्लीची अभूतपूर्व कोंडी ! वाहतूक कोलमडली

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Bharat Bandh : शेतकर्‍यांच्या कृषी कायद्यांच्या विरोधात भारत बंद दरम्यान, दिल्ली आणि एनसीआरच्या भागात वाहतूकीची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. दिल्ली गुरुग्राम सीमेवर सकाळपासूनच गाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत. कित्येक तासांनंतरही लोक वाहनांमध्ये अडकले आहेत.

संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली

(Bharat Bandh) शेतकऱ्यांनी गाझीपूर बॉर्डर, केएमपी, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे देखील रोखले. यामुळे दिल्ली आणि नोएडा गाझियाबादला जोडणाऱ्या NH-9 आणि NH-24 वरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दिल्ली पोलीस, गाझियाबाद पोलीस आणि नोएडा पोलिसांनी देखील वाहतुकीसंदर्भात स्वतंत्र सूचना जारी केल्या होत्या, परंतु सर्वत्र जाम असल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले.

दिल्ली-गुरुग्राम सीमेवर गाड्यांच्या लांबलचक रांगा दिसून आल्या. शेतकऱ्यांनी कुंडली मानेसर द्रुतगती महामार्गही रोखला आहे. गाझीपूर सीमेवरील वाहतूक बंद झाल्याने नोएडा, गाझियाबादहून दिल्लीकडे जाणाऱ्या लोकांवर परिणाम झाला. शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर रोखला. एनएच -9 आणि एनएच -24 वरही शेतकऱ्यांनी तीव्र जाम केला आहे. त्याचवेळी हरियाणाच्या बहादूरगढ येथील रेल्वे स्टेशनवर शेतकरी रेल्वे ट्रॅकवरही बसले, ज्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

मेट्र्रोवरही परिणाम

भारत बंद Bharat Bandh दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील लाल किल्ला, पंडित राम शर्मा सारखे मेट्रो स्टेशन बंद होते. एकही प्रवासी या मेट्रो स्थानकांवरून प्रवास करू शकणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत.

शेतकऱ्यांनी दिल्ली हरिद्वार महामार्गही बंद केला आहे. शेतकऱ्यांनी दिल्ली-हरिद्वार महामार्ग मुजफ्फरनगरजवळ बंद केला, ज्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. त्याचबरोबर शेकडो शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर निदर्शनेही केली. यामुळे दिल्ली, अंबाला आणि फिरोजपूर रेल्वे विभागांवरील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. उत्तर रेल्वेने सांगितले की अंबाला, फिरोजपूर विभागातील 25 गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

कालका शताब्दीसह दोन शताब्दी ट्रेन रद्द कराव्या लागल्या. कटरा ते वंदे भारत द्रुतगती मार्गही रद्द करण्यात आला आहे. जुनी दिल्ली आणि इतर काही स्थानकांवरून सुटणाऱ्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे.

हे ही वाचलं का? 

Back to top button