Luizinho Faleiro : गोव्यात काँग्रेसला दुसरे खिंडार, माजी मुख्यमंत्री तृणमूलमध्ये? | पुढारी

Luizinho Faleiro : गोव्यात काँग्रेसला दुसरे खिंडार, माजी मुख्यमंत्री तृणमूलमध्ये?

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात काँग्रेसला दुसरे खिंडार पडले आहे. दहा आमदारांचा गट दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाला होता. आता काही महिन्यांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असताना नाराज असलेले माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सोमवारी सकाळी सुपूर्द केला.

लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) हे गेली महिनाभरापासून अस्वस्थ होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना हटवा, अशी मागणी ते करत होते. परंतु काँग्रेस श्रेष्ठींनी चोडणकरांवरच विश्वास ठेवला. त्यामुळे फालेरो यांच्यातील नाराजी वाढत गेली. अखेर २० दवसांच्या चिंतनानंतर त्यांनी आपले मौन सोमवारी सकाळी सोडले.

ते तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे समजल्याने दक्षिण गोव्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी होती. लोकांचा जनमानस घेऊन आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर ममता बॅनर्जींचा फॉर्म्युला भारी पडला आहे.

गोव्यातूही भाजपला पराभूत करायचे झाल्यास हाच फॉर्म्युल्याची गरज आहे. आपण २० दिवस चिंतन केल्यानंतरच तृणमूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे फारेलो यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button