गडचिरोली : बिबट्या शिकारप्रकरणी तिघांना अटक | पुढारी

गडचिरोली : बिबट्या शिकारप्रकरणी तिघांना अटक

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : कुरखेडा तालुक्यातील पुराडा वनपरिक्षेत्रांतर्गत रामगड गावानजीकच्या जंगलात बिबट्याची शिकार केल्याची घटना मंगळवारी (दि.१७) उघडकीस आली. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून बिबट्याच्या कातड्यासह ११ नखे जप्त करण्यात आली आहेत. विनायक मनिराम टेकाम (वय ३०, रा. वागदरा), मोरेश्वर वासुदेव बोरकर (वय ४५, रा. रामगड) व मंगलसिंग शेरकू मडावी (वय ५०, रा. वागदरा ता. कुरखेडा) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत.

मंगळवारी रामगडनजीकच्या जंगलात बिबट्याची शिकार करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक धनंजय वायभासे यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेड्याचे उपविभागीय वनाधिकारी मनोज चव्हाण, पुराड्याचे वनपरिक्षेत्राधिकारी बालाजी डिगोळे यांच्या पथकाने सापळा रचून  आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे आणि ११ नखे जप्त केली.

हेही वाचा :

Back to top button