गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याच्‍या आठ वर्षांच्‍या मुलीने घेतला संन्यास | पुढारी

गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याच्‍या आठ वर्षांच्‍या मुलीने घेतला संन्यास

पुढारी ऑनलाईन : गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील हिरे व्यापाऱ्याच्या आठ वर्षीय मुलीने संन्यास घेतला आहे. देवांशी संघवी ही कोट्यवधी रुपयांची वारसदार असतानाही कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली संन्यासी होण्याचा निर्णय घेतला. हजारो लोकांच्या उपस्थितीत आज बुधवारी (दि.१८) सकाळी ६ वाजल्यापासून तिचा दीक्षा घेण्याचा कार्यक्रम  सुरू झाला आहे. देवांशी जैनाचार्य कीर्तियशसूरीश्वर महाराज यांच्याकडून दीक्षा घेणार आहे. देवांशी ही दोन बहिणींमध्ये सर्वात मोठी आहे.

अशी आहे देवांशीची कौटुंबिक पार्श्वभूमी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवांशी ही धनेश संघवी आणि त्यांची पत्नी अमी यांची मोठी मुलगी आहे. यांच्या दोन मुलींमध्ये देवांशी ही मोठी मुलगी आहे. देवांशी हिने आत्तापर्यंत ३६७ दीक्षा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. त्यानंतर तिने संन्‍यास घेण्‍याचा निर्णय घेतला असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. तिचे कुटुंब  संघवी अँड सन्स नावाची हिरे कंपनी चालवते. ही कंपनी सर्वात जुन्या हिरे कंपन्यांपैकी एक आहे. प्रौढ झाल्यावर देवांशीला वारसाहक्काने कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळाली असतील मात्र तिने सर्ऐव षारामाचा त्याग करून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती तिच्‍या नातेवाईकांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button