पुणे : दाम्पत्यावर खुनी हल्ला करणार्‍यांना बेड्या | पुढारी

पुणे : दाम्पत्यावर खुनी हल्ला करणार्‍यांना बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून घरासमोर झोपलेल्या दाम्पत्यावर खुनी हल्ला करणार्‍या तिघांना पोलिसांनी अटक केली. तसेच एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. अनिकेत ऊर्फ दाद्या लक्ष्मण बगाडे (21, रा. शिंदेवस्ती, हडपसर), तुषार कैलास काकडे (19) आणि दीपक ऊर्फ दिपू काकाराम शर्मा (19, तिघेही रा. शिंदेवस्ती, हडपसर) अशी संशयित तिघांची नावे आहेत. 16 जानेवारी रोजी मध्यरात्री फिर्यादी हे त्यांचे राहते घरासमोरील मैदानात झोपले असताना त्यांना ठार मारण्याचे उद्देशाने चौघांनी तलवार, कोयते घेऊन खुनी हल्ला केला. फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या दंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी करून फिर्यादीस जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांची पत्नी व मुलगा यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली होती.

याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, अंमलदार यांनी तेथील तपास करून चौघांना ताब्यात घेतले. तपासात हा गुन्हा जुन्या भांडणातून केल्याचे सांगितले आहे.  उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, पोलिस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी, रोहित झांबरे यांनी ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक सचिन तरडे तपास करीत आहेत.

Back to top button