चंद्रपूर : राजुऱ्यात चार मोटासायकलसह चोराला अटक; चार मोटासायकल जप्त | पुढारी

चंद्रपूर : राजुऱ्यात चार मोटासायकलसह चोराला अटक; चार मोटासायकल जप्त

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राजुरा शहरात रात्री मोटासायकल चोरून नेणाऱ्या चोरट्याच्या राजुरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून चार मोटासायकल ताब्यात घेतल्या आहेत. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (वय 24, रा. सोमनाथपुरा वार्ड, राजुरा) असे आरोपीचे नाव आहे.

13 मे 2024 रोजी फिर्यादी सचिन किसन लाडे (रा. जवाहरनगर वार्ड, राजुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 7 रोजी रात्री फिर्यादी व त्यांचा भाडेकरू यांनी नेहमीप्रमाणे आपल्या आंगणामध्ये आपले दुचाकी वाहन मोटासायकल क्र. एम एच 34 एवाय 5450 आणि मो.सा क्र. एम एच 34 बी ई 0115 लावले होते. सकाळी त्यांना ही दोन्ही दुचाकी वाहने दिसली नाहीत. इतरत्र शोध घेतला असता पण कुठेही आढळुन आले नाही. त्यामुळे त्यांनी राजुरा पोलीस स्टेशन गुन्हा नोंद केला आहे.

सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकलचा शोध घेण्याकरिता शोध पथकातील प्रभारी पोउपनि पांडुरंग डी. हाके, शिपाई सुनिल गौरकार, किशोर तुमराम, महेश बोलगोडवर, रामराव,तिरूपती, योगेश पिदुरकर यांनी एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यांचेकडून या गुन्ह्यातील दोन तसेच गडचिरोली जिल्हयातील पोलीस स्टेशन देसाईगंज वडसा येथे दाखल असलेल्या एक गुन्हयातील मोटार सायकल तसेच एक लावारिश स्थितीत असे एकुण चार मोटार सायकल असा एकुण 1,90,000 रू चा माल जप्त केला असून आरोपी सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे याला बेड्या ठोकल्या आहेत.

Back to top button