Election Commission: त्रिपुरामध्‍ये १६ फेब्रुवारीला तर नागालँड, मेघालयमध्‍ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान; २ मार्चला निकाल

Election Commission
Election Commission
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: गुजरात, हिमाचल आणि दिल्ली महापालिका निवडणुकीनंतर आता नव्या वर्षात ईशान्य भारतातील सात राज्यांपैकी तीन राज्यांत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.   या तिन्ही राज्यातील प्रत्येकी ६० विधानसभा मतदारसंघ निवडणुका होणार आहेत. त्रिपुरा राज्यात मतदान १६ फेब्रुवारीला तर  मेघालय आणि नागालँड राज्‍यांमध्‍ये २७ फेब्रुवारी मतदान होणार आहे. २ मार्च तिन्‍ही राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती आज मुख्‍य निवडणूक आयुक्‍त राजीव कुमार यांनी माहिती दिली. नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बालत होते. यावेळी निवडणुक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल उपस्थित होते.

2018 विधानसभा निवडणूक परिस्थिती

गेल्यावेळीच्या विधानसक्षा निवडणूकात त्रिपुरात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. तर मेघालयात 21 जागा जिंकून काँग्रेसने बाजी मारली. मात्र, तेथे सरकार स्थापन करण्यास काँग्रेस अपयशी ठरली.

त्रिपुराचा विचार केल्यास फेब्रुवारी 2018 ची विधानसभा निवडणूक अनेकार्थांनी महत्त्वाची होती. पश्चिम बंगालनंतर देशात डाव्यांची सतत सत्ता असणारे त्रिपुरा हे एकमेव राज्य. तेथे 25 वर्षांपासून डाव्यांचे सरकार होते. मागील निवडणुकीत भाजपने 35 जागा जिंकत सरकार स्‍थापन केले. तर  डाव्यांची घोडदौड 16 जागांवरच अडली हेती. काँग्रेसची पाटी कोरी राहणारे राज्य म्हणून त्रिपुराचेही नाव जोडले गेले.

ईशान्येकडील राज्यांत काँग्रेससमोर अस्तित्व वाचविण्याचे आव्हान राहणार आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये काँग्रेसचे संघटन विस्कळीत झाले आहे. या तीन राज्यांत लोकसभेच्या पाच जागा आहेत. आकडे कमी वाटत असले तरी ईशान्य भारतामधील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा राज्‍यातील एकूण 24 जागा आहेत. पैकी 14 जागांवर कमळ फुललेले आहे. आगामी निवडणुकीत विरोधकांनी भाजपविरुद्ध चांगली लढत दिली तर त्यांचे महत्त्व वाढू शकते.

भाजपला फायदा, काँग्रेसला मात्र झगडावे लागणार

एवढ्या संख्येने बंडखोर सामान्य जीवन जगत असतील तर त्याचा भाजपला निश्चितच फायदा होईल; पण आगामी निवडणुका पाहता भाजपने तयारी वाढविली. त्यामुळेच मेघालयात तृणमूल काँग्रेसच्या दोन अणि एका अपक्ष आमदाराने 'कमळ' हाती घेतले नाही. प्रादेशिक आघाडीचे समीकरण, स्थानिक समुदाय आणि जमातीशी संबंध वाढवणे आणि 'डबल इंजिन'चे सरकार याचा फॉर्म्युला घेऊन भाजप निवडणूक जिंकण्यात कोणतीही कसूर ठेवणार नाही. काँग्रेसला मात्र या राज्यात बरेच झगडावे लागणार असल्याचे चित्रही दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news