माधव यशवंत पवार गोळीबार प्रकरण : तीन आरोपी गजाआड | पुढारी

माधव यशवंत पवार गोळीबार प्रकरण : तीन आरोपी गजाआड

वाशिम; पुढारी वृत्तसेवा: माधव यशवंत पवार गोळीबार प्रकरण : बंदुकीच्या गोळ्या झाडून एका ३२ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे गावानजीकच्या शेतात १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. मालेगाव पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या १२ तासांत मृतकाची ओळख पटविण्यात यश मिळविले होते.

नागपूर येथील थ्री स्टार हाऊसिंग सोसायटी, साईबाबानगर खरबी हनुमाननगर येथे माधव यशवंत पवार गोळीबार प्रकरण घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस चमू गठित केला होता. अखेर आज नागपूर पोलीस व वाशिम पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तर यातील तीन आरोपीचा शोध सुरू आहे अशी माहिती वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विजय चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक एस. एम. जाधव व मालेगाव पोलीस निरीक्षक डी. एम. धुमाळ आदी उपस्थित होते.

सविस्तर महिती अशी की, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निशिद वासनिक याच्याकडे Ether trade asiaचे बिट कॉईनचे व्यवसायात लोकांनी गुंतावणूक करावी म्हणून ते सेमिनार आयोजित करीत होते. तसेच या व्यवसायाचा हिशोब ठेवीत होते.

बिटकॉईन पैशांची हेरफेर आणि मोबाईलच्या वादातून आरोपीनी नागपूर येथून आपहरण करून त्याला वाशीम येथे रोडचे बाजूला निर्जनस्थळी उतरवले आणि वासनिक याने गोळ्या झाडून खून केला. ही सर्व घटना पोलीस तपासातून समोर आली होती. यानंतर जलद गतीने तपासास सुरूवात केली होती.

यानंतर आरोपी विक्की उर्फ विकल्प विनोदराव मोहोड, (आराधनानगर, खरबी, पोस्टे वाठोडा, मुख्य आरोपी), शुभम उर्फ लाला भीमरावजी कन्हारकार (वय २२, रा. आराधना नगर, नागपूर), व्यकेश उर्फ टोनी मिसन भगत (वय २५ रा. आराधना नगर, नागपूर) यांना अटक करण्यात आली.

तर या घटनेतील आणखी तीन आरोपीचा शोध सुरू आहे. यात निशिद महादेव वासनिक (रा. आराधना नगर, नागपूर, मुख्य आरोपी), गज्जू उर्फ गजानन मुनगुने आणि एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button