मानखुर्द मंडाळा येथील ७ गाळ्यांना आग! मोठे नुकसान | पुढारी

मानखुर्द मंडाळा येथील ७ गाळ्यांना आग! मोठे नुकसान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मानखुर्द वीर जिजामाता भोसले मार्गावर मंडाळा येथील स्क्रॅप मार्केटच्या सात गाळ्यांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.

सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी फर्निचर व भंगाराच्या सामानाचे नुकसान झाले आहे.

मानखुर्द येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळाले असून आग पूर्णपणे आटोक्यात आली.

मंडाळा येथील स्क्रॅप मार्केटला वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असून शॉटसर्किटमुळे आग लागत असल्याचे कारण बऱ्याचदा समोर येत आहे.

Back to top button