सातारा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, २५ हजारात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे ५ जण ताब्यात - पुढारी

सातारा : ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, २५ हजारात प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे ५ जण ताब्यात

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा: जावळी तालुक्यातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने एकाने लैंगिक शोषण (अत्याचार) केले होते. ही घटनेत पीडित कुटुंबियांना २५ हजार रुपयांचे आमिष देऊन गावात प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुलक, अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर असे पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गावातील ५ जणांवर गुन्हा दाखल

या घटनेतील मुख्य संशयित आरोपी बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय ६५, रा. नेवेकरवाडी, ता.जावळी) यास दोन दिवसापूर्वीच अटक करण्यात आली होती. यानंतर पीडित कुटुंबियांना २५ हजार रुपयांचे आमिष दाखवत हे प्रकरण गावातच मिटवण्याचा प्रयत्न गावातील राजकीय प्रतिष्ठित लोक करत होते. यानंतर गावातील ५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोपीने सदर पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वेळा (अत्याचार) असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्थानिक पातळीवर संबंधित आरोपीला समज देखील देण्यात आली होती. मात्र, ज्यावेळी आरोपी बबलिंग सपकाळ याने विकृतीचा कळस गाठला.

आरोपीच्या केलेला कृत्यास पाठीशी घालत २५ हजार रुपये आमिष दाखवत संबंधित पीडित कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास गावातील लोक दबाव टाकत होते. दरम्यान या प्रकरणाची केस मागे घेण्यासाठी ५ जण मेढा पोलीस ठाण्यामध्ये आले होते. त्यावेळी पोलिसांनी गावातील राजकीय प्रतिष्ठित ६ व्यक्तीना अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेत पीडितावर झालेल्या अत्याचाराला महत्व न देता आरोपीस वाचवण्यासाठी पुढे आलेल्या राजकीय प्रतिष्ठित ५ व्यक्तींना मेढा पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली.

जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नमूद गुन्हयामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहे.

हेही वाचलंत का? 

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button