Nashik : अंबडला कंपनीच्या सहा गाळ्यांना आग, लाखोंचे नुकसान | पुढारी

Nashik : अंबडला कंपनीच्या सहा गाळ्यांना आग, लाखोंचे नुकसान

नाशिक (सिडकोः : पुढारी वृत्तसेवा
अंबड औद्योगिक वसाहतीतील गट नं. 61/8 मधील सहा गाळ्यांना आग लागल्याची घटना बुधवारी (दि. 8) घडली. आगीची माहिती अग्निशमन दलास मिळताच 4 बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीचे कारण समजू शकले नाही.

याबाबत वृत्त असे की, औद्योगिक वसाहतीतील कुलस्वामिनी इंडस्ट्रिअल धील, साई सौरभ लॉजिस्टिक प्रा. लि. कंपनी, सिद्धिविनायक इंजिनिअरिंग, श्लोक एंटरप्रायजेस, लवंसार कंपनी, आरू एंटरप्रायजेस टेक्नो इंडस्ट्रिज या कंपनींच्या गाळ्यांना अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीतील 4 बंब दाखल झाले. यात रवींद्र लाड, एस. जी. घुगे, ए. एस. काझी, ए. जी. सोनी, एस. के. शिंदे, आशिष मोरे, निखिल धोंडकर, तेजस चव्हाण, विकास कडाकणे, शुभम देशमुख, भाईदास राठोड, आश्विन राठोड, निखिल वारघडे, सुनील चामे, रोहित जाधव यांनी आग विझविली. आगीमध्ये रॉ मटेरियल, सायट्रिक अ‍ॅसिड, मशीनरी, फिलिंग मशीन, सीओटू मशीन, कटर मशीन, 7 ते 8 सिलिंडर जळून खाक झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button