

कर्जत : पुढारी वृत्तसेवा
कर्जत शहरात आज दुपारी जोरदार वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसाने तालुक्यातील कोळवडी शिवारात कर्जत-राशीन रस्त्यावरील झाड उन्मळून रस्त्यावर पडले. यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
कर्जत शहर परिसरात आज दुपारी जोरदार वादळी वार्यासह सुमारे 15 मिनिटे पाऊस झाला. यानंतर अधूनमधून हलका पाऊस सुरू होता. मात्र, या पावसात सुसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले. जोरदार पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा होती.