जळगाव : पुढारी वृत्तसेवा – रावेर लोकसभेत ज्या खासदांच्या विरोधात न्यायप्रविष्ट केसेस आहेत ते उमेदवारी करत असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विजय काळे यांनी केला आहे. रावेर लोकसभेमध्ये गावातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनाही रुग्णालयात जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. दहा वर्षापासून खासदार असतानाही रावेर लोकसभा मतदारसंघ समस्यांनी घेरलेला असल्याचा आरोप करत काळे यांनी नाव न घेता रक्षा खडसे यांच्यावर निशाणा साधला.
रावेर लोकसभा मतदारसंघातील माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विजय रामकृष्ण काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रावेर लोकसभेमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. कापूस व शेतीपिकांच्या भाववाढीचे प्रश्न गंभीर झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे मतदारसंघास समस्यांनी ग्रासले आहे तर दुसरीकडे, असे असतानाही गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेल्यांच्या विरोधात नाही प्रविष्ट केस सुरू आहे. मात्र तसे असताना ते उमेदवारी करीत आहेत. दूध संघातील घोटाळे आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये आपण मागे आहोत. मोठ्या प्रमाणात पैसा येतो तो जातो कुठे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागरिकांचा केवळ वोट बँक म्हणून वापर केला जातो आहे. तसेही अशुद्ध पाण्याचा पुरवठा गावापासून शहरात होत आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही. हा प्रश्न प्रलंबित असताना त्यांना कसे राष्ट्रीय नेत्यांमध्ये स्थान मिळाले असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा –