सिगारेटसाठी दहा रुपये न दिल्याने भोसकून खून! | पुढारी

सिगारेटसाठी दहा रुपये न दिल्याने भोसकून खून!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सिगारेटसाठी 10 रुपये न दिल्याने एका अल्पवयीन मुलाची दिवसाढवळ्या भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आनंद पर्वत परिसरात सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दिल्लीच्या पोलिस उपायुक्त श्वेता चौहान यांनी सांगितले की, रामजस शाळेजवळ मंगळवारी एक मृतदेह सापडला. त्याच्या पोटावर चाकूने भोसकल्याच्या खुणा होत्या. हा मृतदेह आनंद पर्वत येथील रहिवासी विजय याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रवीण (वय 20), जतीन (24), अजय (23) आणि सोनू (20) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

Back to top button