रत्नागिरी : जगबुडी नदीत टेम्पो बुडाला ; चालक सुखरूप | पुढारी

रत्नागिरी : जगबुडी नदीत टेम्पो बुडाला ; चालक सुखरूप

खेड : पुढारी वृत्तसेवा : येथील जगबुडी नदीला आलेल्या भरतीच्या पाण्यामध्ये शहरालगत नदीपात्रात उतरलेला एक मालवाहू टेम्पो बुडाला. तर चालक प्रसंगावधान राखत नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर पडला. ही घटना आज (दि. २२) सायंकाळी घडली.

खेड शहराला लागून असलेल्या मच्छी मार्केटसमोर उथळ नदी पत्रात चालकाने टेम्पो उतरवला होता. नदीच्या पात्रात भरतीचे पाणी चढू लागल्याने चालकाने टेम्पो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु टेम्पोचे चाक रुतल्याने टेम्पो पाण्यामध्ये बुडू लागला. अचानक घडलेल्या प्रकरामुळे चालकाने प्रसंगावधान राखून नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर पडला. काही वेळातच भरतीचे पाणी इतके वाढले की, टेम्पो अर्ध्याहून अधिक भरतीच्या पाण्याखाली बुडाला. उशीरापर्यंत हा टेम्पो काढण्यासाठी स्थानिक नागरिकांचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, या ठिकाणी नदीचे पात्र उथळ असल्यामुळे अनेक वाहनचालक या ठिकाणी आपल्या गाड्या धुण्यासाठी जातात. अनेक वेळा भरती आणि ओहोटीच्या वेळा लक्षात न आल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. गेल्या तीन -चार वर्षातील ही चौथी घटना आहे, असे मच्छि मार्केट परिसरातील व्यावसायिकांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button