देशाची एकता, अखंडताबाबत कोणतीही तडजोड करु नका : पंतप्रधान मोदी | पुढारी

देशाची एकता, अखंडताबाबत कोणतीही तडजोड करु नका : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशाची एकता आणि अखंडता याबाबत कोणतीही तडजोड करु नका. तसेच राष्ट्र प्रथम ही भावना सदैव मनात ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi)  यांनी नागरी सेवा दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी केले. एकता आणि अखंडता मजबूत करण्यासाठी अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यक्रमातही सरकारी सेवेतील अधिकारी-कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावेत, असेही मोदी यांनी यावेळी नमूद केले.

राष्ट्र प्रथम हे प्रत्येक कामाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे, असे सांगून मोदी  (Prime Minister Modi) पुढे म्हणाले की, येत्या काही वर्षांत आपण देशाच्या स्वातंत्र्याची शंभरी साजरी करणार आहे. स्वातंत्र्यानंतरची कित्येक दशके चलता है, असे म्हणत गेली. पण स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षी तशी परिस्थिती राहता कामा नये, यासाठी आतापासूनच झटले पाहिजे. बदलत्या काळाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे तितकेच आवश्यक आहे. पारंपरिक गोष्टी बदलाव्यात, यासाठी सरकारनेही लोकांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. बदल कसा होतो, याचे उदाहरण म्हणून चालूवर्षी सुरु झालेल्या १४ स्टार्टअप आणि युनिकॉर्नकडे पाहता येईल. रालोआ सरकारने २०१४ साली सत्ता हाती घेतल्यानंतर पहिल्या पाच वर्षांतच कालबाह्य झालेले १५०० कायदे हद्दपार केले. सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असून त्याकडे अधिकारी-कर्मचार्‍यांनी बारकाईने पाहणे तितकेच आवश्यक आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button