Ratnagiri News : डिंगणी येथे बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला | पुढारी

Ratnagiri News : डिंगणी येथे बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

साडवली, पुढारी वृत्तसेवा : डिंगणी चाळकेवाडी (ता. संगमेश्वर) येथे बिबट्याचा मृत अवस्थेतील बछडा शुक्रवारी (दि.17) आढळून आला. या बछड्याचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्यात झाला असल्याची प्राथमिक माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे.

प्राण्यांच्या हल्लात बछड्याचा मृत्यू

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिंगणी चाळकेवाडी येथे शुक्रवारी (दि.17) सकाळी 8 वाजता रस्त्यालगत बिबट्याचा बछडा हा मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती डिंगणीचे पोलीस पाटील यांनी फोन करुन वनविभागाला दिली. या माहितीच्या आधारावर संगमेश्वर तालुका वनविभागाच्या रेस्क्यू टिमने घटनास्थळी भेट दिली. वनक्षेत्र पालांनी पंचासमवेत घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृत बिबट्या अंदाजे तीन ते चार महिने वयाचा मादी प्रजातीचा असल्याचे निदर्शनास आले. पंचनाम्या दरम्यान या बछड्याच्या मानेवर दाताच्या खोल खुणा दिसून आढळल्या. तसेच त्या जखमेतून रक्तमिश्रीत पाणी येत असल्याचे देखील दिसून आले. या बरोबरच पायालासुद्धा जखम असल्याचे आढळले.

शवविच्छेदन अहवालात मृत्युचे कारण स्पष्ट

मृत बछड्याच्या शरीराची मापे घेवून वनविभागाने शव ताब्यात घेतले. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी, यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू हा वन्यप्राण्यांच्या हल्यात जखमी होवून झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आणि त्यांच्या कर्मचारी यांच्यामार्फत पंचासमक्ष मृत बिबट्यास त्याच ठिकाणी लाकडाची चिता रचून दहन करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूबाबतचा अधिक तपास विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार व त्यांचे अधिनस्त वनपाल संगमेश्वर, वनरक्षक आकाश कडुकर व वनरक्षक कराडे हे करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button