Pushpa 2 : चित्रपटाला मिळाली ४०० कोटींची ऑफर, तगडी रक्कम पाहून निर्माते म्हणाले...
पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ चित्रपट इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ने कमाईच्या बाबतील तगडे कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. हिंदी व्हर्जनमध्येही चित्रपटाने १०० कोटी रुपयांची अधिक कमाई केलीय. ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. या चित्रपटाची क्रेझ एवढी आहे की अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा ..पुष्पराज, मैं झुकेगा नही’ हा प्रसिद्ध डायलॉग लोकांच्या ओठावर कायम आहे.
आता चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘पुष्पा २’ (Pushpa 2) रिलीज होण्यापूर्वीच ब्लॉकबस्टर ठरल्याच्या बातम्या आहेत. या चित्रपटाला जवळपास ४०० कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. (Pushpa 2)
रिपोर्टनुसार, ‘पुष्पा २’ रिलीज होण्याआधीच या चित्रपटासाठी खरेदीदारांची ओढ लागली आहे. सूत्रांचा हवाला देत उत्तरेतील एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या निर्मात्यांना ४०० कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. प्रोडक्शन हाऊसने देशभरातील सर्व भाषांमध्ये चित्रपटाच्या हक्कांसाठी एवढी मोठी रक्कम देऊ केली आहे. फक्त थिएटरसाठी ही ऑफर देऊ केली आहे. त्यात OTT आणि टीव्ही अधिकारांचा समावेश नाही.
मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही ऑफर नाकारल्याचे बोलले जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच एवढी मोठी ऑफर मिळाल्याने ‘पुष्पा २’ किती मोठा हिट ठरू शकतो हे स्पष्ट होतं. निर्मात्यांनाही खात्री आहे की ‘पुष्पा २’ हा पहिल्या भागापेक्षा मोठा ब्लॉकबस्टर ठरेल.
पुष्पा द राईज चित्रपटाला य़श मिळाल्यानंतर अल्लू अर्जुन पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटातून सर्वांच्या मनावर राज्य केलयं. आता ‘पुष्पा २’ आणण्याची तयारीही सुरू झाली आहे. पुष्पा द राइज या चित्रपटाच्या सिक्वेलकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा दुसरा भाग कधी येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
- सोलापूर : ‘त्या’ चिठ्ठीने फोडले पोलिसांचे बिंग?
- गैरमार्गाने टीईटी पात्र ठरलेले सर्वाधिक नाशिक विभागातील
- आव्हानात्मक काम मिळेल अशी प्रार्थना करा; पंतप्रधान मोदी यांचा प्रशासनिक सेवा विद्यार्थ्यांना संदेश
View this post on Instagram