मराठी ‘वेबसीरिज’चाही जगभरात वाजतोय डंका! | पुढारी

मराठी ‘वेबसीरिज’चाही जगभरात वाजतोय डंका!

सुवर्णा चव्हाण

पुणे : रहस्यकथांवर आधारित वेबसीरिज असो वा एखाद्या थरारक घटनेवर आधारित वेबसीरिज…सध्या मराठीमध्ये वेबसीरिजची निर्मिती वाढली असून, या वेबसीरिजला यू-ट्युबवर जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. वेगळ्या धाटणीचे विषय अन् मांडणीची वेगळी पद्धत यामुळे आता मराठीतील वेबसीरिजही नावलौकिक मिळवत असून, यू-ट्यूबवरील व्ह्युव्जमधून चांगली कमाईही होत आहे.

Covid 4th wave : देशात कोरोनाची चौथी लाट येण्‍याचे संकेत नाहीत : कोव्‍हिड टास्‍क फोर्स प्रमुखाचा दावा

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार्‍या मराठी वेबसीरिजचे प्रमाण तसे कमी असले तरी यू-ट्युबच्या विश्वात रोज नवनवीन वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. सीरिजमधून वास्तववादी विषय मांडण्याचा प्रयत्न होत असल्याने त्या वेबसीरिज लोकांपर्यंत पोहचत आहेत. यू-ट्युबवर प्रदर्शित सीरिजमधून प्रायोजकत्व व जाहिराती मिळत असल्याने निर्माते-दिग्दर्शकांची चांगली आर्थिक कमाई होत आहे.

Earthquake : जपान भूकंपानं हादरला, २ मृत्यू, बुलेट ट्रेन रुळावरून घसरली, २० लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत

दिग्दर्शक नितीन पवार म्हणाले, ‘विविध देशांमध्ये राहणार्‍या मराठी भाषिकांकडून मराठी वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वास्तववादी विषय अन् त्यांच्या गावातील मातीतील दृश्य असे सारेकाही या सीरिजमध्ये पाहायला मिळत असल्याने आमच्या सीरिजला जवळपास 79 देशांतून व्ह्युव्ज मिळतात. या देशांमधील मराठी लोक वेबसीरिज बघतात यापेक्षा सगळी बघतात. अभिप्रायही कळवतात. त्यामुळे जगभरात सीरिज जगभरात पोचत आहेत हे नक्कीच.’

हिम्मत असेल तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन दाखवा : संजय राऊत यांचे केंद्र सरकारला आव्हान

दिग्दर्शक अजित पाटील म्हणाले, ‘अ‍ॅक्शन, रहस्यकथा आणि थ्रिलर अशा मराठी वेबसीरिजला सध्या चांगला प्रतिसाद आहे. ओटीटीपेक्षा यू-ट्युबवर प्रदर्शित होणार्‍या सीरिजची संख्या अधिक आहे. मराठी वेबसीरिजची संख्याही वाढली असून, यु-ट्यूबमध्ये मिळणार्‍या व्ह्युव्जचे प्रमाण चांगले आहे. मी सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज तयार केली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. चांगला विषय, चांगली मांडणी आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यातून साकारलेल्या सीरिजला सध्या चांगले व्ह्युव्ज आहेत.’

नागपूर : २०२४ च्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करेल : देवेंद्र फडणवीस

Back to top button