RCB vs GT : नाणेफेक जिंकत बंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय | पुढारी

RCB vs GT : नाणेफेक जिंकत बंगळुरूचा गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातविरूद्धच्या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात आपला संघ कोणताही बदल न करता खेळताना दिसेल, असे कर्णधार फाफ डुप्लेसिसने सांगितले. त्याचबरोबर गुजरातचा संघ दोन बदलांसह खेळताना दिसणार आहे. या सामन्यात मानव सुथारला पदार्पणाची संधी मिळाली आहे. याशिवाय जोशुआ लिटलला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.

इम्पॅक्ट प्लेयर : संदीप वारियर, विजय शंकर, जयंत यादव, नळकांडे, बीआर शरथ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विल जॅक, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशाख.

इम्पॅक्ट प्लेयर : अनुज रावत, महिपाल लोमरोर, आकाश दीप, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई.

Back to top button