Janhvi Kapoor : इश्क कबूल है! बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या नावाचे लॉकेट जान्हवीच्या गळ्यात? | पुढारी

Janhvi Kapoor : इश्क कबूल है! बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या नावाचे लॉकेट जान्हवीच्या गळ्यात?

पुढारी ऑनलाईन डेस्क : जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया नेहमी एकत्र स्पॉट होतात. पण,दोघांनीही कधी आपले नाते सार्वजनिक केले नाही. दोघे नेहमी एकत्र तिरुपती मंदिर जाताना दिसले. (Janhvi Kapoor) मागील महिन्यात ‘मैदान’ च्या स्क्रीनिंग वेळी जान्हवीने वेगळ्या पद्धतीने आपल्या नात्याची पुष्टी केली. तिने गळ्यामध्ये एक चेन घातली होती. त्यामध्ये शिकू नावाचे पेडंट दिसले. त्यावरून फॅन्स अंदाज बांधू लागले की, हे शिखर पहाडियाच्या नावावरूनचं तयार करण्यात आलेले पेडंट आहे. (Janhvi Kapoor)

शिखरला ती प्रेमाने ‘शिकू’ बोलावते. ‘कॉफी विथ करण’ शोमध्येदेखील तिने हे नाव घेतलं होतं. जान्हवीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्लासी चेकर्ड ड्रेस परिधान केलेले फोटो पाहायला मिळतात. या फोटोमध्ये तिचे नेकपीस स्पष्ट दिसते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका युजरने म्हटलंय की, सून सुंदर. आणखी एका युजरने म्हटलंय- राणी वापस आली. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय- वा, काय आत्मविश्वास आहे आपल्या BF विषयी. एकाने लिहिलं- मंगळसूत्र बनवलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Back to top button