जवळाबाजारचा विकास लोकप्रतिनिधीस मताधिक्य मिळाला तरच होतो !  | पुढारी

जवळाबाजारचा विकास लोकप्रतिनिधीस मताधिक्य मिळाला तरच होतो ! 

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : जवळाबाजार गावातून कोणत्याही निवडणुकीत विजयी लोकप्रतिनिधीस मताधिक्य मिळाले तरच गावात विकासासाठी निधी मिळतो. लोकप्रतिनिधी मंडळी कडून सध्या तरी विकासासाठी निधीचा श्रीगणेश झाला नाही कारण सध्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अंतर्गत मिळालेल्या निधी कामे कमी व खर्च जास्त अशी अवस्था झाली आहे.  जवळाबाजार परिसरात ग्रामपंचायत, सहकारी संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय डावपेच चालतात. कारण जवळाबाजार येथे सर्व  राजकीय पक्षाचे मोठ्या प्रमाणात लोक आहेत. विविध पक्षांचा बालेकिल्ला जवळाबाजार आहे.

जवळाबाजार परिसरात माजी सहकारमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा आमदार असताना जवळाबाजार येथे मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत. राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनीही पदावर मुनीर पटेल असताना विविध माध्यमांतून निधीतून गावाचा व परिसरातील गावांंमध्ये विकासाचे कामे केली आहेत. पण मागील १० वर्षांमध्ये जवळाबाजार येथून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी लोकप्रतिनिधी नेते मताधिक्य मिळाले नाही. जवळाबाजार गावाच्या सार्वजनिक विकास कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे विकास जवळपास २० वर्षे मागे पडला आहे.

जवळाबाजार येथे १३२ के. व्ही. उपकेंद्र , बसस्थानक संकुल, उपडाघर, पोलीस सटेशन , महसूल भवन, ग्रामीण रुग्णालय, विविध सार्वजनिक विकासाचे प्रस्ताव माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा काळात मांडलेआहेत. राज्य शासनाने व केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पण गावातून विजयी लोकप्रतिनिधी मताधिक्य मिळाला नाही यामुळे विकास काम प्रस्ताव धुळखात पडुन आहेत. सध्या जवळाबाजार परिसरात जिल्हा परिषद गट नेते अंकुशराव आहेर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत निधी कामे सुरू केली आहेत.

माजी सभापती मुनीर पटेल यांनी काँग्रेस पक्ष मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आगामी काळात मुनीर पटेल यांच्या कडून विकासासाठी निधी उपलब्ध व शासन दरबारी प्रस्ताव पडलेले मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिक करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, भाजपा, पंचायत समिती राष्ट्रवादी, जिल्हा परिषद शिवसेना, विधानसभा राष्ट्रवादी, लोकसभा शिवसेना  पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत पण जवळाबाजार येथून मताधिक्या अभावी राज्य व केंद्र सरकार निधी मिळत नाही यामुळे जवळाबाजार येथील मतदार मंडळी मतदान कोणालाही केले तरी विकास कामावर प्रश्न निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडिओ : “महिलांनी राजकारणात आलं पाहिजे” – खा. प्रियांका चतुर्वेदी | Power Women | International Women’s Day 2022 

Back to top button