लातूरची बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम; मुलींची बाजी

file photo
file photo

लातूर; पुढारी वृत्तसेवा: बारावी बोर्ड परीक्षेचा लातूर विभागीय मंडळाचा निकाल 92.36 असा लागला असून आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवीत लातूर जिल्ह्याने 94.30 अशी टक्केवारी मिळवत विभागात बाजी मारली आहे. 91.17% मिळवत विभागात धाराशिव जिल्हा दुसऱ्या स्थानावर राहिला. तर 91.11 टक्के  मिळवत नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर स्थिरावला आहे. नेहमीप्रमाणे या निकालात मुलींनीच बाजी मारली असून त्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 95.30 टक्के  तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 89. 86 अशी आहे. गतवर्षीचा निकाल पाहता यावर्षी विभागाच्या निकालात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याच्या निकालात लातूर सातव्या क्रमांकावर आहे.

लातूर मंडळात 92 हजार 932 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नामांकन केले होते. त्यात 91 हजार 528 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 84 हजार 541 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागात 36 हजार 127 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यात 35 हजार 589 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 33 हजार 563 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर जिल्ह्याचा निकाल 94.30 टक्के असा लागला आहे. धाराशिव जिल्ह्यातून 16 हजार 406 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नामांकन केले होते. त्यापैकी 15 हजार 576 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 14 हजार 365 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 91.17 टक्के लागला आहे.

नांदेड जिल्ह्यातून 40 हजार 754 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. 40 हजार 183 विद्यार्थी परीक्षेत बसले तर त्यातील 36 हजार 613 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत नांदेड जिल्ह्याचा निकाल 91.11 टक्के लागला आहे . विज्ञान शाखेचा निकाल ९७.८१ टक्के, कला शाखा ८४.१० टक्के ,वाणिज्य शाखा ९२.३१ तर व्होकेशनलचा ८३.८९ टक्के असा लागाला असल्याचे लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news