Zahoor Mistry : कंदहार विमान अपहरणातील दहशतवादी जहूर मिस्त्री याची पाकिस्तानात हत्या | पुढारी

Zahoor Mistry : कंदहार विमान अपहरणातील दहशतवादी जहूर मिस्त्री याची पाकिस्तानात हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंदहार विमान अपहरण करणाऱ्या कटात सहभागी असलेल्या जहूर मिस्त्री (Zahoor Mistry) या दहशतवाद्याची पाकिस्तानातील कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. १९९९ मध्ये एअर इंडियाच्या आयसी – ८१४ विमानाच्या अपहरण करण्यात जहूरचा सहभाग होता.

दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मिस्त्रीवर (Zahoor Mistry) गोळीबार केला. हल्लेखोर दोघांच्याही चेहऱ्यावर मास्क होते. त्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही. ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. दरम्यान, हे दोन्ही हल्लेखोर रऊफ असगर कराचीमध्ये अखुंदच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. असगर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि जैश प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट ओळखपत्र तयार करून मिस्त्री अनेक वर्षांपासून कराचीमधील अख्तर कॉलनीमध्ये राहत होता. तसेच तेथेच तो काम करत होता. त्याचे जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेशी संबंध होते.

इंडियन एअरलाइन्सच्या आयसी -८१४ या विमानाने काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे उड्डाण केले होते. मात्र, संध्याकाळी ५.३० वाजता विमान भारतीय हवाई हद्दीत दाखल होताच दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले होते. हे विमान अमृतसर, लाहोर आणि दुबईमार्गे अफगाणिस्तानच्या कंदहार येथे नेण्यात आले होते.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ :”महिलांनी राजकारणात आलं पाहिजे” – खा. प्रियांका चतुर्वेदी | International Women’s Day 2022

Back to top button