Volkswagen Virtus : फॉक्सवॅगनची नवीन कार वीरटसचे बुकिंग सुरु, पहा फिचर्स | पुढारी

Volkswagen Virtus : फॉक्सवॅगनची नवीन कार वीरटसचे बुकिंग सुरु, पहा फिचर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर्मन ऑटोमेकर, फॉक्सवॅगनने (Volkswagen) आता भारतीय ग्राहकांसाठी त्यांच्या वीरटस (Virtus) या नवीन कारचे बुकिंग सुरु केले आहे. ही कार मे २०२२ मध्ये लाॅंच केली जाणार आहे. ही नवी कार कंपनीच्या VW Vento ची जागा घेईल.

Volkswagen Virtus ही आकर्षक डिझाइन, वैशिष्ट्ये आणि जर्मन अभियांत्रिकीसह ही नवीन मिडसाईज आकाराची सेडान कार आहे.
या कारची सर्वाधिक विक्री होणाऱ्या Honda City तसेच नवीन Skoda Slavia, Maruti Ciaz आणि Hyundai Verna यांच्याशी स्पर्धा असेल. विशेष बाब म्हणजे फॉक्सवॅगन Virtus प्लॅटफॉर्म आणि इंजिनसह बहुतांश वैशिष्ट्ये ही स्कोडा स्लाव्हिया सारखीच आहेत. पण या दोन्ही सेडान कार दिसायला एकदम वेगळ्या आहेत.

 

फॉक्सवॅगन ग्रुपसाठी, सेडान ही भारतीय बाजारपेठेसाठी त्यांच्या 2.0 धोरणाचा एक भाग आहे. SUV कार ला प्राधान्य देणाऱ्या खरेदीदारांकरिता हे महत्त्वाचे धोरण कंपनीने ठेवलेले आहे. नवीन Volkswagen Vitus मधील खास वैशिष्ट्यांमुळे आरामदायी आणि सोप्या ड्रायव्हिंगचा एक अविस्मरणीय अनुभव घेता येतो.

कंपनी मे महिन्यात या कारची किमत जाहीर करेल. कंपनीने वीरटस ही कार लॉन्च करण्यापूर्वी तिचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन कार मॉडेल हे प्रीमियम मिडसाईज सेगमेंटमधील सर्वात लांब आहे.

Volkswagen Leather Leatherette Seat UpholsteryVirtus Active Cylinder Technology 1.5 TSIVolkswagen Wireless App Connect Android Auto and Apple Carplay

521-लिटरचे सर्वोत्तम-इन-सेगमेंट केबिन आणि बूट स्पेस देते. Virtus हे भारत 2.0 प्रकल्पांतर्गत सादर केले जाणारे दुसरे मॉडेल आहे. नवीन अनावरण केलेली फॉक्सवॅगन वीरटस डायनॅमिक लाइन आणि परफॉर्मन्स लाइन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Volkswagen Virtus About

गेल्या तीन वर्षांत 22 हून अधिक नवीन SUV लाँच करण्यात आल्या आहेत. फॉक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ग्राहकांसाठी एसयूव्ही ही मुख्य शैली आहे. पण सेडान मॉडेलचा चाहता वर्गाचे प्रमाण भारतीय बाजारपेठेतही वाढत आहे.

Virtus Volkswagen Connectivity

सेडान आणि एसयुव्ही मधील फरक

सेडान – i) सेडानला कमी ग्राउंड क्लीयरन्स असतो
ii) सहसा चार दरवाजे असतात, परंतु दोन दरवाजे असलेले मॉडेल देखील असतात.

एसयुव्ही- i) यामध्ये उच्च ग्राउंड क्लीयरन्स आहे.
ii) SUV ला चार चाके आणि चार दरवाजे आहेत.

वीरटसची (Virtus) वैशिष्ट्ये

  • न्यू फोक्सवॅगन वीरटस ही आकर्षक रचना आणि आकर्षक लूक असणारी कार आहे
  • सहा रंगांमध्ये उपलब्ध – वाइल्ड चेरी रेड, कुरकुमा यलो, कँडी व्हाइट, रिफ्लेक्स सिल्व्हर, कार्बन स्टील ग्रे आणि राइजिंग ब्लू मेटॅलिक.
  • Virtus ची लांबी 4,561mm, रुंदी 1,752mm आणि उंची 1,487mm आहे.
  • वाहनाचा व्हीलबेस 2,651 मिमी आणि बूट स्पेस 521-लिटर आहे.
  • 1.0 लीटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन
  • 7 स्पीड DSG ऑटोमॅटिक ट्रान्समिशन
  • 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक
  •  इंजिन आणि पॉवर- यामध्ये 2 इंजिन पर्याय आहेत, ज्यामध्ये 1.0 लीटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन 108bhp पॉवर आणि 175Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

हेही वाचा

 

Back to top button