‘आरटीई’च्या दुसर्‍या यादीत 1,849 विद्यार्थ्यांची निवड | पुढारी

‘आरटीई’च्या दुसर्‍या यादीत 1,849 विद्यार्थ्यांची निवड

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत दुसर्‍या फेरीत 1 हजार 849 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, पालकांना त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी 21 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी जाहीर केले आहे.

आरटीई प्रवेशासाठी पुणे जिल्ह्यात 957 शाळांची नोंदणी झाली असून, 15 हजार 126 जागांसाठी 62 हजार 960 इतके अर्ज आले आहेत. 15 हजार 126 जागांसाठी लॉटरी पद्धतीने 14 हजार 958 विद्यार्थ्यांची निवड झाली. यातील 10 हजार 372 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर 1 हजार 275 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत. 3 हजार 311 विद्यार्थ्यांच्या पालकांनी निवड झालेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ranji Trophy : मुंबईने गाठली फायनल

पहिल्या प्रतीक्षा यादीत 4 हजार 218 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, 1 हजार 905 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, तर 276 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झालेले आहेत. 2 हजार 39 विद्यार्थ्यांच्या पालकांनी निवड झालेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

76 हजार 45 विद्यार्थ्यांचे प्रवेश

यंदा राज्यातील 9 हजार 86 शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या 1 लाख 1 हजार 906 जागांसाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यातील नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून 1 लाख 19 हजार 971 विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. त्यापैकी आतापर्यंत 76 हजार 45 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही प्रवेशाच्या तब्बल 25 हजार 861 जागा उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा 

नगर : ग्रामीण पोलिस ठाणे इमारत प्रस्ताव अडकला लालफितीत

दोन अल्पवयीन मुलींचे राहुरीमधून अपहरण

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मंगळवारी प्रस्थान; राज्यभरातून दिंड्या होऊ लागल्या दाखल

Back to top button