नगर : ग्रामीण पोलिस ठाणे इमारत प्रस्ताव अडकला लालफितीत | पुढारी

नगर : ग्रामीण पोलिस ठाणे इमारत प्रस्ताव अडकला लालफितीत

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा: कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे भाग्य उजाडल्यानंतर आता ग्रामिण पोलिस ठाण्याची नव्याने इमारत उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व शासनस्तरावर लालफितीत अडकला आहे. त्यास मंजुरी मिळताच लवकरच ग्रामिण पोलिस ठाण्याला स्वत:च्या प्रस्तावित जागेत नवीन इमारत उभी रहाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सध्या ग्रामीण पेालिस ठाणे सि.स.नं.1624 मध्ये कार्यरत आहे. 5362 चौरस फुटांमधील 2000 चौरस फूट ग्रामीण पोलिस ठाण्याने नगरपालिकेकडे रितसर मागणी करून तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. एकूण 53 गुंठ्यांची जागा असून त्यापैकी 20 गुंठे जागा ग्रामिण पोलिस ठाण्याला मंजूर झाली आहे व नगरपालिकेने नाहरकत ती नुकतीच पोलिस ठाण्याकडे वर्ग केली आहे.

खेलो इंडिया : ऑलिम्पिकसाठी पायाभरणी

त्यात आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे प्रशासक मुख्याधिकारी शांताराम गोसावी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील योगदान दिले आहे. तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिटी सर्व्हे कार्यालयाकडूनही सकारात्मक प्रतिसाद व तातडीने लागणारे नकाशे व इतर बाबींची पूर्तता करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

आता तो त्यांच्याकडून शासनस्तरावर गृहमंत्रालयाकडे गेल्यावर त्यास लवकरच मंजूरी मिळणार आहे, अशी माहिती ग्रामिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. कोपरगाव शहर पोलिस ठाणे व शिर्डी पोलिस ठाणे या दोन इमारती नुकत्याच विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आल्या आहेत. आता शहर पोलिस ठाण्याचे जसे नव्या पोलिस ठाण्यात रुपांतर झाले आहे, त्याप्रमाणे ग्रामीण पोलिस ठाण्याचीही स्वत:च्या जागेची वानवा संपुष्टात येणार आहे.

Belgaum : कारवारमधील कोकणी फलकांना काळे फासणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रामिण पोलिस ठाणे सध्या ज्या ठिकाणी कार्यरत आहे. तीच जागा आता नगरपालिकेने पोलिस ठाण्याकडे हस्तांतरीत केल्याने त्याच जागेवर आता लवकरच नवीन पोलिस ठाण्याची प्रशस्त इमारत आजी-माजी लोकप्रतिनिधींनी चालना दिल्यास दुसरी प्रशस्त इमारत कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारी ठरेल.

Back to top button