राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रकार सुरूच आहे. आरडगाव व मानोरी येथील दोन 17 वर्षीय अल्पयीन मुलींना फूस लावत पळवून नेल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आला आहे.
मानोरी येथे 14 जूनच्या रात्री रात्रीच्या वेळी संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भोसले (रा. खंडेश्वरीनगर, जि. बीड) याने लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याचा गुन्हा पोेलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस उपनिरीक्षक सज्जन नर्हेडा हे करीत आहेत.
यासह आरडगाव येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला कशाचे तरी अमिष दाखवून 16 जून रोजी मध्यरात्री तीन वाजेदरम्यान तीन आरोपींनी अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. याबाबत आरोपी दत्तात्रय कैलास मोरे, किशोर साळुंखे, शरद सोनवणे (रा. वरखेड ता. गंगापूर जि. औरंगाबाद) या संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राहुरी परिसरात दैनंदिन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना सुरू आहेत.