Apple smartwatch : नवर्‍याने मारलं पण, ‘स्मार्ट वॉच’ने तारलं! | पुढारी

Apple smartwatch : नवर्‍याने मारलं पण, 'स्मार्ट वॉच'ने तारलं!

पुढारी ऑनलाईन : ॲपल वॉच हे स्मार्ट वॉचपेक्षाही अधिक स्मार्ट (Apple smartwatch) आहे. ते तुमच्या आरोग्याविषयी माहिती देतेच  त्‍याच्‍यासोबत तुमच्या दैनंदिन कामांचा मागोवाही घेतं. तसेच  आत्तापर्यंत या वॉटने अनेकांचे जीवदेखील वाचवल्याचे आपण ऐकले आहे. अलीकडे एका महिलेला तिच्या पतीने जिवंतच दफन केले होते; पण ॲपल वॉचमुळे तिचे प्राण वाचले.

ॲपल स्मार्ट वॉच अनेकांना त्यांच्या अनियमित हदयाच्या ठोक्यांची माहिती देत, त्यांचे प्राण वाचवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वॉचमधील फॉल डिटेक्शन हे फिचरदेखील अनेकवेळा लोकांच्या मदतीसाठी आले आहे. पण यावेळी मात्र ॲपल वॉचने (Apple smartwatch)  वॉशिंग्टनमधील एका महिलेला भयानक परिस्थितीतून बाहेर काढत पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

डेलीमेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, ४२ वर्षीय यंग सूक या महिलेवर तिच्या पतीने चाकूने वार केले. यानंतर तिला सिएटलच्या नैऋत्येस सुमारे ६० मैलांवर असलेल्या दफन केले होते. मात्र ॲपल वॉचने (Apple smartwatch)  तिच्या 20 वर्षीय मुलीला तिच्या आपत्कालीनाची सूचना पाठवली. महिलेनेही आपली सुटका करत ॲपल स्मार्ट वॉचवरून ९११ हा नंबर डायल केला. यानंतर पोलिसांनी या महिलेची मदत करत तिचा जीव वाचवला. या घटनेसंर्दभात पोलिसांनी म्हटले आहे की, जेव्हा ही महिला सापडली तेव्हा ती अत्यंत बिकट परिस्थितीत होती. तिला पायाला, हाताला आणि डोक्याला मोठ्याप्रमाणात जखमा झाल्या होत्या. तिचे कपडे आणि केस धुळीने माखले होते.

हेही वाचा:

Back to top button