GT vs RR : गुजरातचे राजस्थानला १७८ धावांचे आव्हान | पुढारी

GT vs RR : गुजरातचे राजस्थानला १७८ धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १७७ धावा केल्या. राजस्थानला विजयासाठी १७८ धावांची गरज आहे. गुजरातकडून डेव्हिड मिलरने ४६ आणि शुभमन गिलने ४५ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २८, अभिनव मनोहरने २७ आणि साई सुदर्शनने २० धावांचे योगदान दिले. ऋद्धिमान साहा चार आणि रशीद खानने एक धाव काढून बाद झाला. राजस्थानकडून संदीप शर्माने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात केवळ २५ धावा दिल्या. संदीपनेही दोन गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट, अॅडम झाम्पा आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.

अपडेट्स

गुजरातला चौथा धक्का; शुभमन गिल बाद

सामन्याच्या १६ व्या ओव्हरमध्ये गुजरातला चौथा धक्का बसला. राजस्थान गोलंदाज संदीप शर्माने त्याला बाद केले. त्याने आपल्या खेळीत ३४ बॉलमध्ये ४५ धावांची खेळी केली.

गुजरातला तिसरा धक्का; हार्दिक पंड्या बाद

सामन्याच्या ११ व्या ओव्हरमध्ये गुजरातला तिसरा धक्का बसला. राजस्थानचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला जैस्वालकरवी झेलबाद केले. हार्दिकने आपल्या खेळीत १९ बॉलमध्ये २८ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावले.

पॉवरप्लेनंतर गुजरातचा स्कोर ४२/२

गुजरात टायटन्सने पॉवरप्ले मध्ये सहा ओव्हरमध्ये दोन गडी गमावत ४२ धावा केल्या. शुभमन गिल १२ बॉलमध्ये १५ धावा करून नाबाद आहे. हार्दिक पांड्याने दोन बॉलमध्ये एक धाव घेतली आहे. साई सुदर्शनच्या रूपाने गुजरातला आणखी एक धक्का बसला. पाचव्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर तो धावबाद झाला. सुदर्शन १९ बॉलमध्ये २ चौकारांच्या मदतीने २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

गुजरातला दुसरा धक्का

सामन्याच्या पाचव्या ओव्हरमध्ये गुजरातला दुसरा धक्का बसला. ओव्हरमधल्या शेवटच्या बॉलवर धाव घेताना साई सुदर्शन रन आऊट झाला. त्याने आपल्या खेळीत १९ बॉलमध्ये २० धावा केल्या. यामध्ये त्याने २ चौकार लगावले.

गुजरातला पहिला धक्का

सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गुजरातला पहिला धक्का बसला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज बोल्टने गुजरातच्या साहाला बाद केले. साहा आपल्या खेळीत ३ बॉलमध्ये ४ धावा केल्या.

हेही वाचा; 

Back to top button