पुढारी ऑनलाइन डेस्क : Apple Watch सध्या तंत्रज्ञान क्रांतीचे युग आहे आणि 'वेअरेबल टेक्नॉलॉजी' हे या तंत्रयुगाचे मोठे वैशिष्ट्य आहे. यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गोष्टींची माहिती कळते आणि संभाव्य धोक्यापासून तुमचे संरक्षण होते. 'हेल्थ डिटेक्टर वॉच' ही सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण वेअरेबल टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये तुम्ही दररोज किती चालता आणि तुम्ही किती चालायला हवे, मधुमेहाविषयक महत्वूपूर्ण माहिती, तुमच्या शरीरात किती पाणी आहे, इतकेच नव्हे तर तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचे मोजमापही तुम्हाला कळवते. मार्केटमध्ये अशा अनेक ब्रँडचे घड्याळ उपलब्ध आहे. त्यापैकीच ॲपलचे हे एक वॉच! आतापर्यंत तुम्ही अनेकांनी ऐकले असेल की ॲपलच्या घड्याळाने हृदयाची बदललेले ठोके, ऑक्सिमीटर रेट वेळेत कळवल्याने अनेकांचे जीवन वाचले आहे. मात्र, ॲपलचे घड्याळ महिलेला ती आई होणार असल्याची गोड बातमी देखिल देते. हे नुकत्याच एका घटनेवरून समोर आले आहे.
एका 34 वर्षीय महिलेने Reddit वर तिचा Apple Watch चा अनुभव शेअर केला आहे. तिने तिच्या अनुभवात सांगितले आहे की तिच्या ॲपलचे घड्याळ तिला सतत 15 दिवस तिच्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढ झाल्याचे दर्शवत होते. तिने लिहिले आहे की, सामान्यपणे तिचे हृदयाची विश्रांतीची गती 57 ठोके इतकी आहे. पण त्यात वाढ होऊन 72 इतकी झाली होती.
तिने म्हटले आहे की, हृदयाच्या विश्रांतीची गती का वाढली आहे हे जाणून घेण्यासाठी तिने तिचे दैनंदिन दिनचर्येत निरीक्षण करायचे ठरवले. कुठे काही चुकत आहे का? ती नियमित जीमला जाते. उत्तम आहार घेते, सोबतच ती तिच्या 18 महिन्याच्या मुलाला दूध देखिल वेळेत पाजते. त्यामुळे हृदयाची गती वाढण्याचे काहीच कारण नव्हते. असे तिच्या लक्षात आले. इथे लक्षात घेण्यासारखे हे होते की तिला तिची मासिक पाळी देखिल आली नव्हती.
Apple Watch हृदयची गती वाढण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामुळे तिने प्रथम कोविड चाचणी केली. मात्र, ती देखिल नकारात्मक आली. तिने सर्दी तापाची चाचणी देखिल केली. मात्र ती देखिल सामान्य होती. त्यामुळे तिने यासंबंधी ऑनलाइन अधिकाधिक शक्य कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिला एका ऑनलाइन लेखात असे आढळले की महिलेच्या गर्भधरणेच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या हृदयाची गती वाढते. ती म्हणाली की तिने असे वाचले की कधी-कधी गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात असे होते. तिने त्यानंतर ताबडतोब तिची गर्भधारणा चाचणी केली व ती सकारात्मक आली.
Apple Watch त्यानंतर तिने डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा एकदा याची खात्री करून घेतली. डॉक्टरांनी चाचण्या करून तिला सांगितले की तिला गर्भधारणा होऊन चार आठवडे झाले आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये असल्याने तिला अन्य कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. पण ॲपलच्या घड्याळाने तिला तुमच्या शरीरात काही तरी वेगळे घडत आहे. याची माहिती दिली कारण तिच्या हृदयाची गती वाढली होती.
महिलेने तिला गर्भधारणेची बातमी दिल्याबद्दल ॲपलच्या घड्याळाला याचे श्रेय दिले आहे. तसेच तिने अन्य लोकांना घड्याळात हृदयाच्या गतिसंदर्भात जे अपडेट्स दाखवले जातात त्याकडे लक्ष द्या, असे सूचवले आहे.