पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) बुधवारी (दि. २६) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात या पदाचा कार्यभार (Congress president) स्वीकारला. यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व काँग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सीएलपी नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसीच्या इतर पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. वरील सर्व संबंधितांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल (K. C. Venugopal) यांनी निमंत्रण पाठवले होते. (Congress president Mallikarjun Kharge)
मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात जाण्यापूर्वी राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले
खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शशी थरूर (Shashi Tharoor) यांना पक्षाच्या सर्वोच्च पदाच्या शर्यतीत मोठ्या फरकाने पराभूत केले. २४ वर्षांनंतर कॉंग्रेसचे अध्यक्षपद मिळवणारे ते पहिले गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती आहेत. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात खर्गे यांना राष्ट्रपतीपदाच्या लढतीत ७,८९७ मते मिळाली तर त्यांचे विरोधक शशी थरूर यांना १,०७२ मते मिळाली. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.
गांधी घराण्याचे एकनिष्ठ आाणि विश्वासू सहकारी म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची ओळख आहे. जाणून घेवूया त्यांचा थोडक्यात राजकीय प्रवास जाणून घेवूया.
हेही वाचा